Shivaji University | कुलगुरूपदाच्या अर्जांची उद्यापासून छाननी Pudhari Photo
कोल्हापूर

Shivaji University | कुलगुरूपदाच्या अर्जांची उद्यापासून छाननी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यभरातून 115 अर्ज केले आहेत. यात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह 115 जणांचा समावेश आहे. अर्जांची छाननी दि. 9 व 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा कार्यकाल 6 ऑक्टोबर 2025 रोजी पूर्ण झाला. त्यानंतर कुलगुरू निवड समितीने तीन सदस्यांपैकी एकाची निवड केली. सध्या पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे कुलगुरूपदाचा प्रभारी कार्यभार सोपवला आहे. कुलपती कार्यालयाने कुलगुरूपदासाठी 23 डिसेंबर ते 27 जानेवारी या कालावधीत अर्ज मागवले होते.

शेवटच्या दिवसापर्यंत 115 जणांनी या पदासाठी अर्ज भरले आहेत. सोमवार व मंगळवार दोन दिवस अर्जांची छाननीची प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची कच्ची यादी जाहीर होऊन त्यावर हरकती मागवल्या जातील. हरकतींचे निरसन करून अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर निवड समितीकडून मुलाखत प्रक्रिया पार पडेल. त्यातून पाच उमेदवारांची नावे अंतिम केली जातील. यामधून एकाची निवड होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT