Screen addiction effects | स्क्रीन अ‍ॅडिक्शन ढकलतेय स्मृतिभ्रंशाच्या खाईत! 
कोल्हापूर

Screen addiction effects | स्क्रीन अ‍ॅडिक्शन ढकलतेय स्मृतिभ्रंशाच्या खाईत!

झोपेत बिघाड, मेंदूवरील ताण आणि वर्तनातील बदल ठरताहेत धोक्याची घंटा

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : मोबाईल, टॅबलेट आणि इतर डिजिटल स्क्रीनचा वाढता वापर आता मेंदूच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरत आहे. सतत स्क्रोलिंगच्या लागलेल्या सवयीमुळे स्मृतिभ—ंशसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या सवयीमुळे मेलाटोनिन हार्मोनचे स्रवण कमी होऊन झोपेचे चक्र विस्कळीत होत असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. विशेषतः, तरुणांपासून ते मध्यमवयीन गटात स्क्रीन अ‍ॅडिक्शनचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, त्याचा परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचा इशारा मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

झोपेचा अभाव हा स्मरणशक्ती सुद़ृढ ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने, सततची झोपेची कमतरता मेंदूतील स्मृती साठवण्याची प्रक्रिया (मेमरी कन्सोलिडेशन) कमकुवत करते. यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात, विस्मरण वाढते आणि संज्ञानात्मक क्षमता हळूहळू घटते. डिजिटल उत्तेजनामुळे मेंदूतील डोपामाईन सिस्टीम अतिसक्रिय होते. यामुळे व्यक्तीची निर्णयक्षमता, लक्ष आणि भावनिक संतुलन यावर परिणाम होऊ शकतो.

असा होतो मेंदूत केमिकल लोचा

* जास्त वेळ स्क्रीन वापरल्यामुळे झोपेचे चक्र बिघडते आणि झोप व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो.

* मोबाईलच्या सततच्या नोटिफिकेशन्समुळे मेंदूला व्यसन लागल्यासारखे होते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते.

* दीर्घकाळ स्क्रीन वापरल्याने मेंदूवर ताण येतो आणि त्याची कार्यक्षमता कमी होऊ लागते.

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मोबाईलला दूर ठेवा

* स्क्रीनचा वापर पूर्णपणे टाळणे शक्य नसले, तरी त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.

* झोपण्यापूर्वी किमान 1 ते 2 तास स्क्रीनपासून दूर राहिल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते.

* नियमित झोपेची वेळ पाळणे मेंदूच्या स्मरणशक्ती आणि कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचे ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT