GBS Disease | कळंब्यात ‘जीबीएस’ आजाराने शाळकरी मुलाचा मृत्यू 
कोल्हापूर

GBS Disease | कळंब्यात ‘जीबीएस’ आजाराने शाळकरी मुलाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

कळंबा : कळंबा तर्फ ठाणे (ता. करवीर) येथे गिलियन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामधील एका शाळकरी मुलाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. राजवर्धन नितीन बुचडे (वय ११, सध्या रा. श्री महालक्ष्मी गल्ली, कळंबा, मूळ गाव कणदूर, ता. शिराळा, जि. सांगली) असे त्‍याचे नाव आहे. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते.

राजवर्धन हा नातेवाइकांसोबत कळंबा येथे भाडेकरू म्हणून राहत होता. दीपावली सुट्टीच्या निमित्ताने कणदूर या मूळ गावी गेला होता. मात्र, २० नोव्हेंबर रोजी त्याच्या घशात अचानक दुखू लागल्यामुळे व अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला कुटुंबीयांनी उपचारांसाठी तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले होते. आठ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, प्रकृती गंभीर बनल्याने उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्‍यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT