kolhapur | चिमगाव येथे शाळकरी मुलाचा स्लॅबवरून पडून मृत्यू 
कोल्हापूर

kolhapur | चिमगाव येथे शाळकरी मुलाचा स्लॅबवरून पडून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

मुरगूड : चिमगाव (ता. कागल) येथील शाळकरी मुलगा आयान सूरज ताशिलदार हा खेळत असताना स्लॅबवरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यूू झाला. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे .

आयान ताशिलदार हा दुपारी गल्लीतील पार्वती रतन पुरीबुवा यांच्या बांधकामावरील स्लॅबवर खेळत होता. अचानक त्याचा तोल गेल्याने तो खाली कोसळला व बेशुद्ध पडला. उपचारासाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात नेले असता तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT