कोल्हापूर : दिवाळी सुट्टीनंतर मंगळवार, दि. १२ पासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू होणार आहेत. १५ दिवसांनी वर्ग भरणार असल्याने शाळा परिसर पुन्हा गजबजणार आहे.
शिक्षण विभागाने प्राथमिक, माध्यमिक शाळांना दिवाळी सुट्टी जाहीर केली होती. दिवाळीच्या सुट्टया २६ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत होत्या. याच काळात शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणाचे कामकाज लावण्यात आले होते. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्यामुळे काही शिक्षक निवडणूक कामात व्यस्त असणार आहेत. दरम्यान, सोमवारी महापालिका क्षेत्रातील खासगी व महापालिकेच्या अखत्यारीतील प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत; तर मंगळवारी शहरातील माध्यमिक शाळा सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.