यड्राव, पुढारी वृत्तसेवा : शहापूर येथे मित्रांसोबत पोहायला गेलेल्या समर्थ पप्पू नवले (वय 11, रा. शहापूर इचलकरंजी) या शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी 4.45 च्या सुमारास घडली. याबाबत इंदिरा गांधी इस्पितळाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी शहापूर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे.
समर्थ इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता. त्याला पोहायला येत नव्हते. आज दुपारी त्याचे मित्र विहिरीत पोहायला जात होते. त्यांच्यासोबत समर्थही गेला. पोहत असताना तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्राने आरडाओरडा करीत नातेवाईकांना याची माहिती दिली. विहिरीतील पाण्याची पातळी फारच कमी असल्यामुळे सार्थकला पाण्याबाहेर काढले. त्याचे नातेवाईक मोहन गोरख नवले यांनी तातडीने त्याला उपचाराकरिता इंदिरा गांधी इस्पितळात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच सार्थकचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला. रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली होती. त्याच्या मागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.