कोल्हापूर : कपाळी भंडारा अन् ‘उदं ग आई उदं’चा गजर करत भाविक सौंदत्ती येथील रेणुका यात्रेस रवाना होण्यास रविवारपासून सुरुवात झाली. कोल्हापूर शहरातील पेठांमधून राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या एस.टी. बसेससह खासगी वाहनांमधून भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे सौंदत्तीच्या दिशेने रवाना झाले.
‘उदं-उदं बोला डोंगराला चला...’ अशा भक्तिभावाने महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आसपासच्या राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक सौंदत्तीच्या रेणुका यात्रेत सहभागी होत असतात. यंदा यात्रा गुरुवार, दि. 4 डिसेंबर रोजी होणार असून आतापासूनच भाविक रवाना होऊ लागले आहेत.
जिल्ह्यातील रेणुका भक्त मंडळ, करवीर तालुका रेणुका भक्त संघटना, ताईबाई गल्ली रेणुका भक्त मंडळ, व्हिनस कॉर्नर रेणुका भक्त मंडळ यांच्यासह विविध रेणुका भक्त संघटनांनी यात्रेची विशेष तयारी केली आहे. या अंतर्गत रविवारपासून (दि. 30, नोव्हेंबर) ते बुधवारपर्यंत (दि. 3 डिसेंबर) भाविक यात्रेसाठी रवाना होणार आहेत. यासाठी एस.टी. महामंडळाने 120 बसेस सज्ज ठेवल्या आहेत.
फरची पांढरी टोपी, भगवे सदरे आणि साड्या अशा एकसारख्या पोषाखातील महिला-पुरुष भाविकांनी हलगीच्या ठेक्यावर लेझीम व मर्दानी खेळ खेळत मिरवणूक काढून ताईबाई गल्ली रेणुका भक्त मंडळाने अनोख्या पद्धतीने सौंदत्ती यात्रेसाठी प्रयाण केले. यावेळी माजी नगरसेवक अदिल फरास, बाबा पार्टे, मंडळाचे संस्थापक अच्युत साळोखे, दीपक लोखंडे, संदीप तथा नाना सावंत, कमलाकर खोत, मधुकर रसाळ,