Satej Patil | ‘गोकुळ’च्या अस्तित्वासाठी एकजूट दाखवा : सतेज पाटील 
कोल्हापूर

Satej Patil | ‘गोकुळ’च्या अस्तित्वासाठी एकजूट दाखवा : सतेज पाटील

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : गोकुळ दूध संघ ही उत्पादक शेतकऱ्यांची संस्था आहे. संस्‍थेचे अस्तित्व टिकविण्यासाठी एकजूट दाखवा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. गोकुळ निवडणुकीत भुदरगड तालुक्यातील ठरावधारकांनी शुक्रवारी (दि. २६) अजिंक्‍यतारा कार्यालय येथे आ. पाटील यांची भेट घेतली. यावेळी झालेल्‍या बैठकीत ते बोलत होते.

आ. पाटील म्‍हणाले, गोकुळची स्थापना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी झाली. दुधाच्या उत्पन्‍नामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले. गोकुळ टिकले, तरच दूध उत्पादकांचे हित सुरक्षित राहील. त्यामुळे संस्था वाचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहावेे. दूध उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण करून कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्‍न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक जीवन पाटील यांनी दूध उत्पादकांचा आ. पाटील यांच्यावर विश्‍वास असल्याचे सांगितले.

सचिन घोरपडे यांनी गोकुळचे नेतृत्व सक्षम हातात राहणे आवश्यक असून बहुतांश दूध उत्पादक आणि ठरावधारकांची भावना सतेज पाटील यांच्या बाजूने असल्याचे नमूद केले. शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश पाटील यांनी गोकुळच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. बैठकीला अमर पाटील, एस. एम. पाटील, एन. के. देसाई, भुजंगराव मगदूम, बाबासो देसाई, दिलीप केणे, सागर देसाई, अमर बरकाळे, अमोल पाटील, ऋषीकेश पाटील, नेताजी आरडे, विश्‍वजित हाप्पे, जयवंत पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT