Satej Patil | Pudhari Photo
कोल्हापूर

Satej Patil : अमल महाडिकांसोबत वरचेवर भेट होते; पण तुमची वेळ मिळेना

आमदार सतेज पाटील यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आमदार अमल महाडिक यांच्यासोबत अलीकडे माझी वरचेवर भेट होत आहे; पण तुमची वेळ मिळेना झाली आहे, असा टोला काँग््रेासचे आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँक संचालक मंडळ बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग््रेासचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला. आमदार पाटील यांच्या टोल्याला मंत्री मुश्रीफ यांनी ही तर बदलत्या राजकारणाची नांदी असल्याचे प्रत्युत्तर दिले. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या राजकीय टोलेबाजीमुळे उपस्थित संचालकांमध्ये हशा पिकला.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाहूपुरी येथील मुख्य शाखेत सोमवारी संचालक मंडळाची बैठक झाली. बैठक अंतिम टप्प्यात असताना आमदार सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे काही चर्चेसाठी दोन मिनिटांची वेळ मागितली. यावर मंत्री मुश्रीफ यांनी आधी सौर उर्जा प्रकल्पाचे अनावरण करूया मग चर्चा करू, असे सांगितले. यावर आमदार पाटील यांनी अलीकडे माझी आणि अमल महाडिकांची वरचेवर भेट होत आहे; पण तुमची वेळ मिळत नाही आहे, अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याला मंत्री मुश्रीफ यांनीही ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे, अशा शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आमदार पाटील त्यांच्या पुढील कामासाठी बँकेतून निघून गेले. तर मंत्री मुश्रीफ व अन्य संचालक सौरऊर्जा प्रकल्प उद्घाटनासाठी गेले.

आ. महाडिकांबाबतच्या वक्तव्याने सारेच अवाक्‌‍

महाडिक आणि पाटील गटातील टोकाचा संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र, आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेत आमदार अमल महाडिक आणि माझी वरचेवर भेट होते, या वक्तव्याने उपस्थित अन्य नेते, संचालक अवाक्‌‍ झाले, तर मंत्री मुश्रीफ यांनी ही तर बदलत्या राजकारणाची नांदी असल्याचे दिलेले प्रत्युत्तर यामुळे ही खरच जिल्ह्याच्या राजकारणाची बदलती नांदी आहे का, असाही प्रश्न उपस्थितांना पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT