Satej Patil | गुटखा, अमली पदार्थांची विक्री, साठाप्रकरणी काय कारवाई केली? Pudhari File Photo
कोल्हापूर

Satej Patil | गुटखा, अमली पदार्थांची विक्री, साठाप्रकरणी काय कारवाई केली?

आ. सतेज पाटील यांचा विधान परिषदेत प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यात गुटखा व तत्सम अमली पदार्थांची छुप्या पद्धतीने व अवैध मार्गाने विक्री, साठा व वाहतूक करणार्‍या व्यावसायिकांवर तसेच संबंधित क्षेत्रातील जबाबदार अधिकार्‍यांवर आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे, असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला.

राज्यात मुंबई, ठाणे, पालघर ग्रामीण व शहरी भागातील पानपट्टी दुकानांवर गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांची सर्रासपणे विक्री होत असून अशा पदार्थांची राज्यात ट्रेन, पानपट्टी, बसस्थानक, कॉलेज अशा सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे विक्री होत आहे. याकडे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले.

यावर उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भिवंडीसह नाशिक-मुंबई महामार्गावरील सोनाळे याठिकाणी कारवाईची केल्याचे सांगितले. त्याचबरोबर कोकण विभागात 1 एप्रिल 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत प्रतिबंधित अन्नपदार्थ प्रकरणी 71 ठिकाणी कारवाई करून 7,14,38.402 इतक्या किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, 56 जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे,असे सांगितले. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा व वितरण होत असल्याचे निदर्शनास आल्यास कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT