Satej Patil 
कोल्हापूर

Satej Patil : दादा गेले... अन्‌ माझा अ‌ाधारवड हरपला

वडिलांच्या आठवणीने सतेज पाटील झाले भावुक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील हे शिक्षण विश्वातील तसेच राजकारण आणि समाजकारणातील वादळ; पण त्याहीपेक्षा जास्त माझे आयुष्य घडवणारा आधारवड होते. दादा गेले आणि माझा तो आधारवडच हरपला, अशा शब्दांत वडिलांच्या निधनानंतर व्यक्त होताना सतेज डी. पाटील भावुक झाले. एक फार मोठी पोकळी आमच्या जीवनात आली आहे, असे सांगत त्यांनी दु:खाला वाट मोकळी करून दिली.

दादांनी आयुष्यभर असंख्य माणसं जोडली, शिक्षणाचा दीप लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रज्वलित केला आणि समाजसेवेला आयुष्याचे ध्येय मानले. पण मुलगा म्हणून माझी कायम जपली जाणारी आठवण म्हणजे, दादा म्हणजे माझ्यासाठी माणूस म्हणून जगण्याचे संस्कार देणारे, संकटाच्या वेळी धीर देणारे आणि प्रत्येक यश-अपयशात खंबीरपणे सोबत उभे राहणारे वडील होते, असे सांगताना त्यांच्या शब्दांतून वडिलांविषयीचा जिव्हाळा आणि कृतज्ञता प्रकर्षाने जाणवत होती.

दादा आता प्रत्यक्षात नसले, तरी त्यांनी दिलेले संस्कार, विचार आणि माणुसकीचा वारसा हाच माझ्यासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ राहणार आहे, असे सांगताना सतेज पाटील यांचा जड झालेला स्वर बापलेकाच्या नात्यातील ओलावा दाखवणारा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT