Satej Patil | Pudhari Photo
कोल्हापूर

Gokul Election : ‘गोकुळ’ची निवडणूक आम्ही लढवणारच; बिनविरोधचा प्रस्ताव नाही : सतेज पाटील

निवडणुकीबाबत अधिक भाष्य करणे टाळले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत बिनविरोध निवडणुकीवर चर्चा करण्याची गरज नाही, असे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी स्पष्ट केले. याबरोबरच ‘गोकुळ’च्या निवडणुकीबाबत अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले.

जिल्हा परिषद आणि महापालिका सभागृह अस्तित्वात येऊन अनेक महिने उलटले, तरी सदस्यांना अद्याप एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही. जिल्ह्यातील दहा आमदारच सदस्यांच्या हक्काचा निधी पळवून नेत असल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप होत आहे, असा टोला आमदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

जिल्हा परिषद सदस्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार ५१ सदस्यांनी केली आहे. सत्तेत आल्यानंतरही विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांमध्ये आपण सत्तेत येऊन चूक केली, अशी भावना निर्माण होत आहे. महापालिकेतही अशीच परिस्थिती आहे. आलेला निधी आमदारच घेऊन जात असल्याने नगरसेवकांनाही सत्तेचा पश्चाताप होत असल्याचा दावा पाटील यांनी केला.

मनपाच्या सभेसाठी पोलिस बंदोबस्ताची वेळ

महापालिकेत महायुतीचे काय सुरू आहे, हे सर्वजण पाहत आहेत. आता प्रत्येक सर्वसाधारण सभेसाठी चौकात पोलिस बंदोबस्त द्या, अशी मागणी करण्याची वेळ आयुक्तांवर आली आहे, या शब्दांत पाटील यांनी महायुतीच्या नगरसेवकांमध्ये वारंवार होणाऱ्या वादाकडे लक्ष वेधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT