कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या मेळाव्‍यात बोलताना आ. सतेज पाटील. 
कोल्हापूर

Satej Patil | महाविकास आघाडीच्या आसगावकरांना साथ द्या

आमदार सतेज पाटील यांचे मेळाव्यात आवाहन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी हॉटेल पॅव्हेलियन येथे आयोजित मेळाव्यात त्यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी आसगावकरांना पुन्हा विधान परिषदेवर निवडून देण्याचे आवाहन केले.

आ. सतेज पाटील म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आमदार जयंत आसगावकर हे स्वतः शिक्षक असल्याने त्यांना शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आसगावकर यांना निवडून देणे आवश्यक आहे.

आ. जयंत आसगावकर म्हणाले, गेल्या सहा वर्षांत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षक, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर राज्यातील पात्र शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट मिळावी, यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.

यावेळी प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, मुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, प्रा. श्याम पाटील, एस. डी. माने, टी. ए. पोवार, विलासराव अनुसे, एम. बी. टेपुगडे, प्रा. शरद बोरवडेकर, विलास अनुसे, उदय पाटील यांच्यासह प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT