Satej Patil File Photo
कोल्हापूर

Satej Patil | गोकुळसाठी मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांच्या अट्टाहासामुळेच कायद्यात बदल

आ. सतेज पाटील यांचा आरोप; महापालिकेत चांगल्या कामांना सहकार्य

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्या अट्टाहासामुळेच कायद्यात बदल करण्यात आल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला.

ते म्हणाले, महापौर किती महिन्यांचा करायचा हा महायुतीचा अंतर्गत विषय आहे. शहरात चांगली कामे झाली पाहिजेत, ही आमची अपेक्षा आहे. आमच्या ३५ नगरसेवकांचे चांगल्या कामांना सहकार्य राहील. मात्र, चुकीचे काही घडत असेल तर त्याला निश्चितपणे विरोध केला जाईल.

प. महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी वळवू देणार नाही

कृष्णा लवादाच्या निर्णयानुसारच धरणातील पाण्याचा वापर झाला पाहिजे. समुद्रात वाहून जाणारे पाणी मुंबईला नेण्याबाबत आमचा विरोध नाही; मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी वळवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

लाडकी बहीण २०२९ ला लक्षात ठेवणार

निवडणुकीच्या वेळी मतांसाठी लाडक्या बहिणीचा हात धरला; मात्र मतदान झाल्यानंतर सरकारने तिचा हात सोडून दिला आहे. भावाने सोडलेला हात बहीण २०२९ मध्ये नक्कीच लक्षात ठेवेल, असा इशारा त्यांनी दिला.

गोकुळ वाचविण्‍यासाठी चला शपथ घेऊया

कोल्‍हापूर : गोकुळ, सहकार, संविधान आणि लोकशाही वाचविण्‍यासाठी चला शपथ घेऊया, असा उपक्रम इंडिया आघाडी आणि सजग नागरिक मंचच्‍या वतीने आयोजित केला आहे. गोकुळमध्‍ये अध्‍यक्ष निवडीदरम्‍यान बदलेल्‍या कायद्यावरून सरकारची मनमानी उघड झाली आहे. शपथ घेण्‍यासाठी संविधानदिनी गुरुवारी (दि.२६) नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज समाधी स्‍मारक स्‍थळी एकत्र येण्‍याचे आवाहन इंडिया आघाडी आणि सजग नागरिक मंचच्‍या वतीने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT