कोल्हापूर

सर्वेश्वर क्रीडा मंडळाने पटकावले हिम्मतबहाद्दर चषक कबड्डी स्पर्धेत विजेतेपद

रणजित गायकवाड

किणी : पुढारी वृत्तसेवा : क्रीडारसिकांच्या प्रचंड उपस्थितीत येथे सुरू असलेल्या हिम्मतबहाद्दर चषक कबड्डी स्पर्धेत ३५ किलोखालील गटात अत्यंत रोमहर्षक अंतिम सामन्यात सर्वेश्वर क्रीडा मंडळ (शिरोली) संघाने विजेतेपद पटकावले तर हसुरचे जय क्रांती क्रीडा मंडळ उपविजेता ठरले.

६८ व्या दीपावली क्रीडा महोत्सवांतर्गत किणी विद्यार्थी मंडळाच्या वतीने दिवसा व रात्री प्रकाश झोतात दोन दिवस सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत ३५ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत जयक्रांती हसुरने विश्वशांती कामेरीवर ४७-१७ अशा तीस गुणाधिक्यांनीने विजय मिळवला तर सर्वेश्वर (शिरोली) विरुद्ध छावा (शिरोली) या संघादरम्यान खेळला गेलेल्या सामन्यात खेळाडूचे ओळखपत्र व नोंदनीच्या तांत्रिक नियमामुळे सर्वेश्वर संघास पुढे चाल देण्यात आली. अंतिम सामना सर्वेश्वर (शिरोली) विरुद्ध जय क्रांती (हसुर) या संघादरम्यान खेळला गेला. मध्यंतरापर्यन्त दोन गुणांची आघाडी सर्वेश्वर संघाकडे होती. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्याने देण्यात आलेल्या पाच-पाच चढाई खेळात सर्वेश्वर शिरोलीने एक गुणांची आघाडी घेऊन विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद जय क्रांती हसुर संघाने पटकावले. तृतीय क्रमांक छावा शिरोली व विश्वशांती (कामेरी) संघाला विभागुण देण्यात आला.

मंडळाच्या वतीने वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली :

अष्टपैलू खेळाडू : स्वरूप खवरे (सर्वेश्वर शिरोली), उत्कृष्ट चढाई : सुजित भोईटे (जयक्रांती हसुर), उत्कृष्ट पकड : सर्वेश्वर नेहरे छावा शिरोली तर आदर्श म्हणून जय स्पोर्ट्स हसूर दुमाला यांची निवड करण्यात आली. बक्षीस वितरण देणगीदारांच्या हस्ते करण्यात आले. खुल्या गटात २० संघानी सहभाग नोंदवला असुन यामध्ये अत्यंत चुरशीचे सामने रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
या स्पर्धेसाठी निरिक्षक भगवान पवार, पंच प्रमुख सुनील कदम काम पाहिले. जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील (किणीकर) स्वाभिमानी संघटनेचे वैभव कांबळे, पुंडलिक जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष दीपक घाटगे, उदय चव्हाण, विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

किणी येथील हिम्मतबहाद्दर  चव्हाण चषक कबड्डी स्पर्धेतील ३५ किलो गटातील विजेत्या संघाला बक्षीस वितरण करताना अनिल पाटील, पुंडलिक जाधव, अशोक माळी, संजय माने, दीपक घाटगे, वैभव कुंभार धीरज चव्हाण, प्रा.कुबेर पाटील, सुनील पाटील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT