सर्व शिक्षा अभियान बंद 
कोल्हापूर

Kolhapur News : सर्व शिक्षा अभियान बंद; कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

शिक्षण विभागाचे कामकाज विस्कळीत; बेमुदत आंदोलन सुरू

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण मस्के

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षणाचा अविभाज्य भाग ठरलेले सर्व शिक्षा तथा समग््रा शिक्षा अभियान 31 मार्चपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील सुमारे 3 हजार 378 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यामुळे शिक्षण विभागाचे कामकाज पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

केंद्र सरकारकडून गेल्या 24 वर्षांपासून समग््रा शिक्षा अभियान राबविले जात आहे. शिक्षण विभागातील अनेक महत्त्वाची टेबल सर्व शिक्षा अभियानातील कर्मचारी सांभाळतात. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रीतसर परीक्षा व मुलाखतींद्वारे करण्यात आल्या आहेत. योजनेत कार्यरत कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी तात्पुरती नियुक्ती देऊन मध्ये एक महिन्याचा सेवाखंड ठेवत पुनर्नियुक्ती देण्याची पद्धत होती. मात्र, यंदा ही प्रक्रिया थांबली आहे.

31 मार्च रोजी मुदत संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्तीबाबत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे राज्यातील हजारो कर्मचारी अनिश्चिततेत असून, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. याच्याविरोधात आझाद मैदानावर 9 मार्चपासून समग््रा शिक्षा संघर्ष समितीचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. साखळी आंदोलन सुरू असून, जोपर्यंत समग््रा अभियान सुरू होत नाही व पूर्णवेळ सेवेत कायम करण्याचा शासन आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

(उत्तरार्ध)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT