कोल्हापूर

मंगेश चव्हाण, बाळू गोंधळेंसह पाचजणांची कसून चौकशी

दिनेश चोरगे

कुरूंदवाड; पुढारी वृत्तसेवा : सांगली येथील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम खूनप्रकरणी सांगलीचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, बाळू गोंधळेंसह तीन जणांची इचलकरंजी पोलिस उपअधीक्षक कार्यालय आणि कुरूंदवाड पोलिसांतर्फे मंगळवारी दोन तास चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी त्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यांचा जबाब नोंदवून पुन्हा बोलविण्यात येईल त्यावेळी हजर राहण्याची समज नोटीस दिली आहे.

या खूनप्रकरणी संशयित आरोपींच्या पोलिस तपासणीतून आणखी दोन संशयितांची नावे पुढे आली. पोलिस त्यांच्या मागावर आहेत. त्या आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर यातील मुख्य आरोपी कोण? यामध्ये आणखी आरोपी कोण, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

या खूनप्रकरणी पुतण्या प्रफुल्ल कदम याने दिलेल्या फिर्यादीत संतोष कदम हे माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होते. माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, पप्पू चव्हाण, बाळू गोंधळे, कुशल कुदळे, सिध्दार्थ कुदळे व इतर तीन ते चार लोकांनी संतोष यांच्यावर हल्ला केला होता. 28 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्याविरुद्ध सांगली पोलिसात गुन्हा दाखल केला होता. संतोष यांना माजी नगरसेवक चव्हाण व इतर लोकांवर दिलेली तक्रार मागे घे, म्हणून धमकीचे फोन येत असल्याचे संतोष यांनी सांगितले होते.

SCROLL FOR NEXT