सांगली फाटा येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक; ९ किलो गांजा जप्त file photo
कोल्हापूर

सांगली फाटा येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक; ९ किलो गांजा जप्त

Kolhapur News | स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

शिरोली एमआयडीसी : पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील सांगली फाटा येथे गांजा अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तरूणाला शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. सत्यजीत सदाशिव जाधव (वय ३४, जाधव बोअरवेल्स जवळ, विकासनगर, इंचलकरंजी, सध्या रा. रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडील ९ किलो ७८ ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ व इतर साहित्य, असा एकूण २ लाख ३८ हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कोल्हापूर येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी अवैध व्यवसाय अंमली पदार्थांचा साठा व विक्री करीत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या आदेश पोलिसांना दिले आहेत. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची तपास पथके तयार करून गांजाची विक्री व वहातूक करणाऱ्यांची माहिती घेत होते. पथकातील पोलीस सागर चौगुले यांना पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे एक जण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हे पोलीस पथकासह सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकून चौकशी केली असता त्याने रत्नागिरी येथून आणलेला गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरोली एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT