आजरा : घरात खेळत असताना ओढणीचा फास गळ्यात अडकल्याने सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गळफास लागून मृत्यू झाला. आफिया जाबीर शेख (वय १३) असे तिचेे नाव आहे. आजरा पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.
शेख हे नाईक गल्लीत भाड्याने राहतात. सोमवारी रात्री आफिया घरातच खेळत होती. घरातील लाकडी तुळईच्या हुकाला ओढणी बांधून ती झोका घेत होती. खेळताना अचानक ओढणीचा फास गळ्यात अडकला व त्यातच तीचा फास लागून मृत्यू झाला. मुले खेळतात म्हणून दोनच दिवसांपूर्वी वडील जाबीर यांनी ती ओढणी काढून टाकली होती. आफियाने वडील घरात नाही म्हणून खेळण्यासाठी पुन्हा ओढणी बांधली. त्याच ओढणीमुळे आफियाचा मृत्यू झाला.