केशवराव भोसले सभागृहाला लागलेली भीषण आग  Pudhari Photo
कोल्हापूर

Keshavrao Bhosale Theatre : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी

करण शिंदे

कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. गुरुवारी (दि.८) रात्री दहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व नाट्यगृहातून आगीचे लोट बाहेर पडत आहेत. उद्या, शुक्रवारी (दि. 9) होणाऱ्या संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या 134 व्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडली आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कुस्तीमैदानाकडील बाजूस आगीच्या ज्वाला दिसून आल्या. नाट्यगृह इमारतीचे बहुतेक सामान्य लाकडी असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेले नाही. परंतु केशवराव भोसले नाट्यगृहाचा काही भाग कोसळला असून छत कोसळले आहे. केशवराव भोसले जयंतीच्या पूर्वसंध्येला नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे कोल्हापूरकर हळहळले आहेत.

अग्नीशमन दलाच्या आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी

अग्नीशमन दलाच्या आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याबरोबरच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. या आगीवर नियंत्रण आणण्याचे काम संरक्षण दलाकडून करण्यात येत आहे. आगीने एवढे रुद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे सभागृहाचा फक्त सांगडाच राहिला आहे. या सभागृहासोबत जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक कलाकारांचे जवळचे नाते आहे.

सभागृहाचे छत कोसळले

या लागलेल्या भीषण आगीमध्ये कोणत्याही प्रकारे जीवित हाणी झालेले नाही. परंतु केशवराव भोसले नाट्यगऱ्याचा काही भाग कोसळत असून छत कोसळलेले आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात बहुतांश भाग हा लाकडाचा असल्यामुळे आग वाढतच आहे. तसेच आगीवर आटकाव करण्यात सुरक्षा दलाचा कस लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT