कोल्हापूर : शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या बैठकीत बोलताना संभाजीराजे. यावेळी संयोगिता राजे, महापौर रूपाराणी निकम, शहाजीराजे आदी उपस्थित होते.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Sambhajiraje Chhatrapati | रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा प्लास्टिकमुक्त करूया

नियोजन बैठकीत संभाजीराजे यांचे आवाहन : ‘माझा गड, माझी जबाबदारी’ विचार जपा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : प्रतिवर्षी दुर्गराज रायगड किल्ला येथे साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव असून तो प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्व शिवभक्तांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी केले.

भवानी मंडपात शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर रूपाराणी निकम, संयोगिताराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते. संभाजीराजे म्हणाले, ‘माझा गड - माझी जबाबदारी’ हा विचार प्रत्येकाने जपणे आवश्यक आहे. गडावर प्लास्टिक पडणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच पडलेले प्लास्टिक उचलण्याची जबाबदारीही शिवभक्तांनी घ्यावी. सोहळ्यासाठी 40 समित्या स्थापन करण्यात आल्या असून प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी शिस्तबद्धपणे पार पाडावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित लाईट अँड साऊंड प्रणाली रायगडावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जीवन साळोखे यांनी स्वागत केले. समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी फत्तेसिंह सावंत, संजय पोवार, विनायक फाळके, आझाद नाईकवडी आदी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे कार्यक्रम

दि. 5 जून

दुपारी 3.30 : राजमाता जिजाऊ

समाधीला अभिवादन

दुपारी 4.15 : गडपूजन

दुपारी 4.30 : युद्धकलेची प्रात्यक्षिके

सायं. 7.00 : ढोलवादन, लेझीम सादरीकरण

रात्री 8.00 : देवीचा गोंधळ

दि. 6 जून

सकाळी 7.00 : ध्वजपूजन

सकाळी 7.30 : शाहिरी कार्यक्रम

सकाळी 9.30 : पालखी मिरवणूक

सकाळी 10.00 : शिवमूर्तीस अभिषेक

सकाळी 10.20 : सुवर्णमुद्रांचा अभिषेक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT