कोल्हापूर

कोल्हापूर : क्रिकेट असो.च्या अध्यक्षपदी संभाजीराजे

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा क्रिकेट असोसिएशन च्या अध्यक्षपदी संभाजीराजे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा क्रिकेट असो.ची सन 2024 ते 2029 ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. रविवारी निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. महेशराव जाधव व सहायक निवडणूक अधिकारी सुबोध देसाई यांच्या उपस्थितीत संस्थेची निवडणूक प्रक्रिया झाली. महिला क्रिकेट वाढीसाठी प्रथमच महिला प्रतिनिधीची निवड करण्यात आली.

निवडणुकीतून बिनविरोध निवडून आलेल्या नवनियुक्त 13 संचालकांची कार्यकारिणी सभा मावळते अध्यक्ष चेतन चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी स्टेडियमवरील कार्यालयात झाली. सभेच्या प्रारंभी संस्थेचे ज्येष्ठ सभासद व आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन पदाधिकारी व सदस्य असे : अध्यक्ष – संभाजीराजे, उपाअध्यक्ष – अभिजित भोसले, खजानिस – विजय सोमाणी, सचिव – शीतल भोसले. सहसचिव – अजित मुळीक, कृष्णात धोत्रे व मदन शेळके. सदस्य : चेतन चौगुले, रमेश हजारे, केदार गयावळ, जनार्दन यादव, रोहन भुईंबर, राजेश केळवकर. स्वीकृत सदस्य – तालुका प्रतिनिधी – किरण रावण (करवीर तालुका), साद मुजावर (कागल तालुका). क्लब प्रतिनिधी डॉ. संजय पाठारे, नितीन पाटील व रहीम खान. महिला स्वीकृत प्रतिनिधी – ज्योती काटकर. संस्थेच्या 55 वषार्र्ंत सभासदांच्या अढळ विश्वासावर सन 2024 ते 2029 ही पंचवार्षिक कार्यकारिणी मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणुकीसाठी ज्या सभासदांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्या सर्वांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्वखुशीने माघार घेतली. बैठकीला संस्थेचे माजी अध्यक्ष आर. ए. तथा बाळ पाटणकर, माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, किरण रावण, नंदकुमार बामणे व नितीन पाटील आदी उपस्थित होते.

कोल्हापूरला प्रथम श्रेणी सामन्यांचे केंद्र बनविणार : संभाजीराजे

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संभाजीराजे यांनी कोल्हापूरच्या क्रिकेट वाढीसाठी व केडीसीएच्या स्वत:च्या मालकीच्या क्रिकेट मैदानासाठी आणि इतर पायाभूत सविधा खेळाडूंना उपलब्ध करून देण्यासाठी सर्व कार्यकारी मंडळ, सभासद व क्रिकेटप्रेमी यांना एकत्र घेऊन सर्वोत्तोपरी क्रिकेट विकासाचे काम होईल. कोल्हापुरात प्रथम श्रेणी क्रिकेटचे जास्तीत जास्त सामन्याचे आयोजन करून कोल्हापूर हे प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्याचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.

SCROLL FOR NEXT