तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन देताना शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील यांच्यासह माजी सैनिक. 
कोल्हापूर

Kolhapur News : मेंढ्या आत नेण्यावरून पोलिस-आंदोलकांत झटापट

एमआयडीसीविरोधात शिरोळ तहसीलमध्ये सैनिक टाकळी ग्रामस्थ आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ, माजी सैनिक व महिलांनी मेंढ्यांसह मंगळवारी शिरोळ येथील तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. यावेळी मेंढ्या आत नेण्यावरून पोलिस-आंदोलकांत जोरदार झटापट झाली.

सैनिक टाकळीत प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीला ग्रामस्थांचा सुरुवातीपासून विरोध आहे. या प्रकल्पामुळे शेतजमिनी आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार असल्याचा दावा करत ग्रामस्थांकडून एमआयडीसी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी मंगळवारी ग्रामस्थांनी शिरोळ येथील मुख्य चौकातून मोर्चाला सुरुवात केली. त्यानंतर शिरोळ प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा धडकला. आंदोलकांनी प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी शेळ्या-मेंढ्या तहसील कार्यालयात नेण्यावर पोलिसांमध्ये वादावादी सुरू झाली. पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलकांनी प्रशासकीय कार्यालयाचे लोखंडी गेट तोडले. यावेळी गेट अंगावर पडल्याने पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

गेट तोडल्यानंतर आंदोलक प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराकडे आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलकांनी कार्यालयाच्या परिसरातच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर तासाभरानंतर तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. यावेळी आंदोलकांनी एमआयडीसी रद्द करा. आमदार यड्रावकर यांच्यावर कारवाई करा, अशा मागण्या देत घोषणाबाजी केली. आंदोलनात आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगेे, शेतकरी नेते रघुनाथ पाटील, दीपक पाटील, अमर पाटील, राकेश जगदाळे, विकास पाटील, आदम मुजावर आदी सहभागी झाले होते. यावेळी डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे, स.पो.नि. शीतलकुमार डोईजड यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ, माजी सैनिक व महिलांनी मेंढ्यांसह मंगळवारी शिरोळ येथील तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. यावेळी मेंढ्या आत नेण्यावरून पोलिस-आंदोलकांत जोरदार झटापट झाली.

सैनिक टाकळीत प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीला ग्रामस्थांचा सुरुवातीपासून विरोध आहे. या प्रकल्पामुळे शेतजमिनी आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार असल्याचा दावा करत ग्रामस्थांकडून एमआयडीसी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी मंगळवारी ग्रामस्थांनी शिरोळ येथील मुख्य चौकातून मोर्चाला सुरुवात केली. त्यानंतर शिरोळ प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा धडकला. आंदोलकांनी प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी शेळ्या-मेंढ्या तहसील कार्यालयात नेण्यावर पोलिसांमध्ये वादावादी सुरू झाली. पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलकांनी प्रशासकीय कार्यालयाचे लोखंडी गेट तोडले. यावेळी गेट अंगावर पडल्याने पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

गेट तोडल्यानंतर आंदोलक प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराकडे आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलकांनी कार्यालयाच्या परिसरातच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर तासाभरानंतर तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. यावेळी आंदोलकांनी एमआयडीसी रद्द करा. आमदार यड्रावकर यांच्यावर कारवाई करा, अशा मागण्या देत घोषणाबाजी केली. आंदोलनात आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगेे, शेतकरी नेते रघुनाथ पाटील, दीपक पाटील, अमर पाटील, राकेश जगदाळे, विकास पाटील, आदम मुजावर आदी सहभागी झाले होते. यावेळी डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे, स.पो.नि. शीतलकुमार डोईजड यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

एमआयडीसी रद्द करून आणणार : संभाजी भिडे

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे म्हणाले, आमदार यड्रावकर यांच्या समर्थकांनी एमआयडीसीच्या हट्टासाठी माजी सैनिकांवर हल्ला केला. त्यांनी मला चुकीची माहिती दिली होती. त्यामुळे मी त्यांचा सत्कार केला होता; पण आता मी या माजी सैनिकांबरोबर आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा अंत पाहू नका. याबाबत मी मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन एमआयडीसी रद्द करून आणल्याशिवाय गप्प बसणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT