कोल्हापूर : सह्याद्री व्याघ प्रकल्पासाठी नव्याने प्रस्तावित केलेल्या कॉरिडॉरची सर्वांनाच धास्ती आहे. या संभाव्य कॉरीडॉरमुळे जिल्ह्यातील 377 गावांत अस्वस्थता पसरली आहे. या कॉरिडॉरची 21 मे पर्यंत अधिसूचना प्रसिद्ध होईल, अशी शक्यता आहे. यामुळे एकदा का याबाबत निर्णय झाला तर या गावांवर वन विभागाचे निर्बंध अटळ आहेत.
सह्याद्री व्याघ प्रकल्पासाठी नवा कॉरिडॉर निश्चित केला जात आहे. याकरिता कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यांतील 550 गावे निश्चित केली आहेत. यामध्ये सर्वाधिक 377 गावे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. कोल्हापूर वन्य जीव विभागातील 33 गावांचाही समावेश आहे. रत्नागिरीतील 20 तर सिंधुदुर्गातील 120 गावांचा समावेश आहे. वन्य जीव विभागाने याबाबतचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच केंद्र शासनाच्या वन्य जीव विभागाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत असून याबाबतची अधिसूचना येत्या 21 मे पर्यंत काढली जाऊ शकते, असे संबधितांचे म्हणणे आहे.
चंदगड : जोगेवाडी, गणूचीवाडी, मुगळी, सोनारवाडी, पोरेवाडी, आमरोळी, सावर्डे इनाम, हिंडगाव, फाटकवाडी, कांजिर्णे, चंदगड, शिरगाव, मजरे शिरगाव, सातवणे, केंचेवाडी, आसगोळी, किरवडे, वाकोली, नागणवाडी, कोरज, गंधर्वगड, कुर्तनवाडी, बेलेभाट, दाटे, वरगाव, गुडेवाडी, जाटेवाडी, तांबुळवाडी, नरेवाडी, कोकरे, अडुरे, जांबरे, नागवे, नावेली, उमगाव, बिजूर, भोगोली, कानूर बुद्रुक, पुंद्रा, कानूर खुर्द, सडेगुडवळे, धामापूर, बुजवडे, गवसे, इबाहिमपूर, शिरोली, सातवडे, अलबादेवी, विंझणे, मोरेवाडी, माळगेवाडी, बोंजुर्डी, अडकूर, उत्साळी, पोवाचीवाडी, कानडी, इनाम म्हाळुंगे, कुरणी, पिळणी, इसापूर, मिरवेल, वाघुत्रे, गुळंब, कळसगादे, कोदाळी, मलतवाडी, तेऊरवाडी, चिंचणे, कामेवाडी, दुंडगे, कोवाड, निट्टूर, जक्कनहट्टी, घुलेवाडी, मौजे कार्वे, मुरकुटेवाडी, तुर्केवाडी, वैतागवाडी, तडशिनहाळ, सुपे, देवरवाडी, शिनोळी खुर्द, शिनोळी बुद्रुक, सुरुते, माडवळे, ढेकोली, ढेकोळीवाडी, जंगमहट्टी, कालिवडे, आंबेवाडी, किटवडे, हेरे, गुडवळे खालसा, खांबादळे, मोटणवाडी, पार्ले, रेडेवाडी, कोनेवाडी, नांदवडे, करंजगाव, हल्लारवाडी, हलकर्णी, शेवळे, पाटणे, जेलुगडे, हाजगोळी, धामणे, कोलिक, म्हाळुंगे खालसा, सरोळी, तुडये, म्हाळवाडी.
पन्हाळा - निवडे, उंड्री, देसाईवाडी, बोरगाव, चव्हाणवाडी, पोर्ले तर्फ बोरगाव, बाजारभोगाव, पोहाळे तर्फ बोरगाव, साळवाडी, वाळोली, वारनूळ, कुंभारवाडी, वाळवेकरवाडी, मोताईवाडी, काऊरवाडी, पोहाळवाडी, पाटपन्हाळा, किसरूळ, मुगडेवाडी, काळजवडे, गोठणे, पोंबरे, कोलिक, पिसात्री, मानवाड, पडसाळी, वाशी.
आजरा- किटवडे, गवसे, आल्याचीवाडी, वेळवट्टी, देवार्डे, मेढेवाडी, देवकांडगाव, विनायकवाडी, दाभील, दर्डेवाडी, हळोली, मसोली, शेळप, पारपोली, आंबार्डे, सुळेरान, आवंढी, कर्पेवाडी खालसा, देऊळवाडी, इटे, खानापूर, मुगडेवाडी, लाटगाव.
भुदरगड - पारदेवाडी, निष्णप, करडवाडी, पाचर्डे, कुंभारवाडी, खेडगे, एरंडपे, दोनवडे, म्हालवाडी, गिरगाव, देवकेवाडी, नितवडे, भाटिवडे, मोरेवाडी, म्हसवे, आकुर्डे, शेणगाव, फये, राणेवाडी, बिद्री, न्हाव्याची वाडी, शेळोली, वर्षेवाडी, पडखंबे, वेंगरूळ, सोनुर्ले, मेघोली, पंडिवरे, मिणचे बुद्रुक, नवरसवाडी, लोटेवाडी, मिणचे खुर्द, ओलवण, पालेवाडी, हेदवडे, आरळगुंडी, बेगवडे, बेडीव, पाल, भेंडवडे, हेळेवाडी, बारवे, नागनवाडी, पांगिरे, बामणे, पिंपळगाव, दिंडेवाडी, मुरुकटे, मानवली, चिवले, डेले, कारिवडे, करंबळी, म्हासरंग, अंतिवडे, नवाले, देऊळवाडी, देवर्डे, वेसर्डे, हणमंते, मनपे, पाटगाव, तांब्याचीवाडी, चिक्केवाडी, वासनोली, भालेकरवाडी, कोंडोशी, चंदनवाडी, मानी, मठगाव, आंतुर्ली, शिवडाव, विंजोळे, शिवडाव खुर्द, तांबाळे, अनप खुर्द, पाळ्याचा हुडा.
राधानगरी - पडसाळी, दुर्गमानवाड, मुसळवाडी, घुडेवाडी, कांबळवाडी, तरसंबळे, कुकडवाडी, कुंभारवाडी, तारळे खुर्द, कंथेवाडी, कळकवाडी, आवळी खुर्द, खिंडी व्हरवडे, गुडाळ, गुडाळवाडी, कसबा तारळे, करंजफेण, कुडुत्री, शिरोली, पिरळ, फराळे, लिंगाचीवाडी, मोघर्डे, मल्लेवाडी, बुजवडे, हेळेवाडी, पनोरी, ऐनी, तळगाव, राई, कंदलगाव, मानबेट.
शाहुवाडी - ऐलवाडी, पाटवडे, माण, परळेनिनाई, पुसार्ले, आळतूर, लोळाणे, जावळी, वारूळ, करूंगळे, निळे, वालूर, कासार्डे, वाकोली, घुंघूर, नांदारी, नंदगाव, माळापुडे, कातळवाडी, परळी, येळवडी, करंजफेण, पेंडागळे, सोनुर्ले, अनुस्कुरा, बुरंबाळ, गिरगाव, मोसम, काटे, बर्की, मरळे, पाल, सावर्डे तर्फ मलकापूर, एंजोली, गेळवडे, पारिवणे, मांजरे, शेंबवणे, गावडी, कुंभवडे, विशाळगड, गजापूर, भाततळी, धनगरवाडी, मुत्कलवाडी, टेकोली, पणुद्रे, म्हालसवडे, कांडवण, उदगिरी, चरणवाडी, मसनोळी, कळकवणे वाडी, तळवडे, आंबा, हुंबवली, घोलसवडे, चांदोली, केर्ले, गोळवणे, भेंडवडे.
गगनबावडा - असळज, खोकुर्ले, बोरबेट, धुंदवडे, खेरीवडे, शेळोशी, सांगशी, सैतवडे, कातळी, गगनबावडा, जर्गी, कडवे, बावेली, गारिवडे, लखमापूर, नावेली, तेलवे, पळसंबे, वेसरफ, कोदे बुद्रुक, आसंडोली, वेसर्डे, निवडे, साखरी, म्हाळुंगे, किरवे, मुटकेश्वर, खडुळे, लोंघे, तिसंगी, बालेवाडी-निवडे, मार्गेवाडी, साळवण, वेतवडे, मंदूर, पाटीलवाडी, मांडुकली, अंदूर, कोदे खुर्द, तळिये बुद्रुक, शेणवडे.