सादळे, कासारवाडी येथे गवे बिनधास्तपणे रस्त्यावरून ये जा करत होते. pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur : सादळे, कासारवाडी गव्यांचे अभयारण्य ?

Sadalye wildlife: भरदिवसा गवे कळपाने रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

कासारवाडी : सादळे, कासारवाडी येथील डोंगरात शनिवारी दिवसभर सुमारे तीस गव्यांचा कळप डोंगर व शेती परिसरात ठिय्या मारून होता. कळप आपल्या शेतात येऊ नये यासाठी शेतकरी आपल्या शेतात उभे होते. गवे बिनधास्तपणे रस्त्यावरून ये जा करत होते. यामुळे गवे पाहण्यासाठी दाजीपूरला न जाता येथेच यावे अशी चर्चा पाहणाऱ्या पर्यटकांच्यात होती.

शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास तीस गव्यांचा कळप गाढव धरा येथील शेती परिसरात शेतकर्यांना आल्याचे समजले. आपल्या शेतात गवे येऊ नये म्हणून शेतकरी आपल्या शेताची राखण करण्यासाठी उभे होते. व गवे जंगलात फिरत होते. इतका मोठा कळप पाहून संदीप निकम, अभयसिंह माने, नामदेव घाटगे शेतकऱ्यांनी वन विभागातला संपर्क केला असता वन विभागातील रेस्क्यू टीम येऊन त्याच्यावरती लक्ष ठेवण्यात आले. सायंकाळी चारच्या सुमारास सादळे येथील हॉटेल ज्योतिबा च्या रस्त्यावरून हा कळप फिरत होता आणि पाचच्या सुमारास सादळे सिद्धेश्वर मंदिर डोंगराकडून शियेच्या बाजूस निघून गेला दिवसभर शेतकरी त्यांच्या मागावर होते.

दाजीपूर अभयारण्यात ज्याप्रमाणे गवे फिरतात तसे गवे सादळे कासारवाडी घाटात व शेती परिसरात वावरताना अनुभव शेतकरी व प्रवाश्यांनी घेतला तर काहीजणांनी आपल्या मोबाईल मध्ये गव्यांचा कळप कैद केला.

गवे कधी एकटे तर कधी कळपाने येथील डोंगर व शेती परिसरात वावर नेहमीचाच झाला आहे. जणूकाही अभयारण्य झाले आहे.
अभयसिंहराजे माने, ग्रा.प सदस्य, कासारवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT