कंडक्टर वडिलांच्या स्मरणार्थ घराला नाव दिलं चक्क ‘कंडक्टर साहेब…’ 
कोल्हापूर

S. T. Conductor : कंडक्टर वडिलांच्या स्मरणार्थ घराला नाव दिलं चक्क ‘कंडक्टर साहेब…’

सोनाली जाधव

प्रवास कोणताही असो तो माणसाला आनंद देतो. प्रत्येकाच्या प्रवासाच्या मार्ग वेगळा. वाहन वेगळं आणि प्रत्येकाच्या आठवणीही वेगळ्या. कोल्हापूर जिल्ह्यातील एका मुलाने आपल्या कंडक्टर वडिलांच्या स्मरणार्थ घराला 'कंडक्टर साहेब '( S. T. Conductor) असं नाव दिलयं. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळंदगे येथील मोहन शंकर सोनावणे यांनी आपल्या कडंक्टर वडिलांच्या स्मरणार्थ घराला नाव दिलं आहे चक्क 'कंडक्टर साहेब'.

S. T. Conductor – 'कंडक्टर साहेब'

१ जुन १९४८ रोजी पुणे- अहमदनगर मार्गावर एस्टीची पहिली बस धावली. तेव्हापासून आजपर्यंत आपल्या असंख्य बसेसद्वारे महाराष्ट्राच्या काना़कोपर्‍यात पोहचलेले एसटीचे जाळे मोठे आहे. बऱ्याच जणांचा एसटीशी संबधीत काही ना काही आठवणी असतात. प्रवाशांच्या जश्या एसटीशी खास अशा आठवणी असतात. तशाच आठवणी एस. टी कंडक्टर आणि ड्रायव्हरांच्याही असतात. तळंदगे येथील मोहन शंकर सोनावणे यांचे वडील एसटी कंडक्टर. त्यांच्या वडिलाचे एसटीवर विषेश प्रेम. एकूण २२ वर्षे त्यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळात कंडक्टर म्हणून सेवा बजावली. मोहन यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर घर बांधलं. वडिलांचे एसटीवरील प्रेम लक्षात घेवून त्यांनी आपल्या घराला चक्क 'कंडक्टर साहेब' हे नाव दिले.

एसटी कर्मचाऱ्यांची मिरवणूक आणि सत्कार

वडिलांच्या एसटीवरील प्रेमाखातर आपल्या घराला "कंडक्टर साहेब" नाव दिलंच आणि वडील कार्यरत असताना जे कंडक्टर आणि ड्रायव्हर कार्यरत होते त्यांचा सत्कार केला. गावातील ग्रामपंचायतीत त्यांना एकत्रित करुन त्यांना फेटे बांधून सत्कार केला. ग्रामपंचायत ते घर अशी मिरवणूक वाजत गाजत काढली आणि त्यांचा सत्कार केला. या अनोख्या सत्काराने राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी भारावून गेले. एवढचं नाही तर गावात येणाऱ्या एसटीचे पुजनही केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT