कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी झुंबड उडाली. सकाळी 11 ते दुपारी 3 या चार तासांत जि.प.साठी 405 जणांनी 554, तर पंचायत समितीसाठी 870 जणांनी 1,075 असे 1,629 अर्ज दाखल झाले. यामुळे जि.प.च्या 68 जागांसाठी 593 उमेदवारांचे 906 अर्ज, तर पं.स.च्या 136 जागांसाठी 1,526 उमेदवारांचे एकूण 2,432 अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांची गुरुवारी (दि. 22) छाननी होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अखेरच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली. बुधवारी अखेरच्या दिवशी तर अर्ज भरण्यासाठी बहुतांशी ठिकाणी झुंबड उडाली होती. एकीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनेक मतदारसंघांत महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटला नाही. दुसरीकडे, बंडखोरी टाळण्यासाठी महाविकास आणि महायुतीने उमेदवारांची यादीही मंगळवारपर्यंत जाहीर केली नव्हती. यामुळे अनेक ठिकाणी पक्षांकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांची कोंडी झाली होती.
महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांची यादी लांबवल्याने काहींनी मंगळवारीच पक्षाकडून, तसेच
अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी जाहीर होताच अनेकांनी पक्षाचे एबी फॉर्म अर्जासोबत जोडले तर काहींनी नव्याने अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच निवडणूक कार्यालयात उमेदवारांसह समर्थक, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काहींनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये महिला उमेदवार आणि महिला कार्यकर्त्यांचाही समावेश लक्षणीय होता.
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी 364 उमेदवारांनी 485 अर्ज दाखल केले. पंचायत समितीच्या 818 उमेदवारांनी 978 अर्ज असे एकूण जिल्हा परिषदेसाठी 593 उमेदवारांचे एकूण 770 तर पंचायत समितीसाठी 1107 उमेदवारांचे एकूण 1333 अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांची उद्या गुरूवारी (दि.22) सकाळी 11 वाजल्यापासून छाननी सुरू होणार आहे. छाननी झाल्यानंतर दि.23 जानेवारी, दि.24 जानेवारी आणि मंगळवार दि.27 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. रविवार दि.25 व सोमवार दि.26 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज माघारीची नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी स्विकारणार नाहीत. यामुळे मंगळवारी दुपारी तीन नंतर जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितींच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दोन दिवसांतच 1995 अर्ज दाखल
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण 2103 अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी तब्बल 1995 अर्ज हे केवळ मंगळवार दि.20 आणि बुधवार दि.21 या दोन दिवसांत दाखल झाले आहेत. या दोन दिवसांत एकूण 1619 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
फटका कोणाला?
बंडखोरी रोखण्यासाठी कसरत
सर्वच पक्षांत नाराजीचा स्फोट
काही ठिकाणी घराणेशाहीचे वर्चस्व
महायुती-मविआ यांच्यात उभी फूट
अंतिम चित्र अर्ज माघारीनंतरच
‘यांनी’ केले पक्षांतर...
राष्ट्रवादीचे आर. वाय. पाटील काँग्रेसमध्ये
चंदगडचे गोपाळ पाटील भाजपमध्ये
भाजपचे डॉ. के. एन. पाटील काँग्रेसमध्ये
राष्ट्रवादीच्या शीतल फराकटे शिवसेनेत
राष्ट्रवादीचे शिवानंद माळी शिवसेनेत
संग्राम कुपेकर भाजपमधून राष्ट्रवादीत
काँग्रेसचे उमेश आपटे ताराराणी आघाडीत