kolhapur Airport | कोल्हापूर विमानतळ विकासासाठी 50 कोटी : पालकमंत्री आबिटकर  
कोल्हापूर

kolhapur Airport | कोल्हापूर विमानतळ विकासासाठी 50 कोटी : पालकमंत्री आबिटकर

विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गती

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने 50 कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मंजूर निधीतून कोहापूर-हुपरी मार्गावरील रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विमानतळावरील सध्याची 1370 मीटर धावपट्टी वाढवून 2300 मीटरपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त 67 एकर जमीन जिल्हा प्रशासनाने संपादित केली; मात्र कोल्हापूर-हुपरी रस्त्याचा प्रश्न सुटल्याशिवाय जमीन ताब्यात घेण्यास प्राधिकरणाने नकार दिला होता. निधी मंजूर झाला असून या रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे.

मंजूर निधी खर्च करण्याचे आदेश

धावपट्टी 2300 मीटरपर्यंत वाढल्यानंतर मोठ्या आकाराची विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरू शकणार आहेत. त्यामुळे मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादयांसारख्या प्रमुख शहरांसोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या शक्यताही निर्माण होणार आहेत. शासनाने मंजूर केलेला निधी 31 मार्च 2026 पूर्वी संबंधित विकासकामांसाठी खर्च करण्याचे आदेश दिले असून खर्चाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT