सीपीआर समोरील गटारात टाकलेला बर्फ घेऊन जात असताना हातगाडीवाला दुसऱ्या छाचाचित्रात संबधिताला जमावाने चांगलाच चोप दिला. Pudhari Photo
कोल्हापूर

नागरिकांच्या जीवाशी खेळ : मृतदेहावरील बर्फाचा वापर शीतपेयासाठी !

Kolhapur Breaking | 'सीपीआर' समोरील हातगाडीवरचा धक्कादायक प्रकार, जमावाने दिला चोप

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूरः छत्रपती प्रमिलाराजे सर्वोचार रुग्णालयाच्या समोर मृतदेह रुग्णवाहिकेतून एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेताना वापरलेला बर्फ थेट थंडपेयात वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या आवारातील थंडपेयाच्या हातगाडीवर हा सर्व प्रकार सुरू होता. शनिवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या हातगाडीवाल्याला चोप देत हा सर्व प्रकार उघडकीस आणला. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीपीआर रुग्णालयाच्या बाहेर नारळ पाणी, ताक, मठा यासह शीतपेय विकणारे हातगाडे आहेत. यातील एका हातगाड्यावर हा प्रकार सुरू होता. या हातगाडीवाल्याने चक्क रुग्णवाहिकेने मृतदेह सोडून आल्यानंतर गटारीत टाकलेल्या बर्फाच्या लाद्या उचलून घेत थेट आपल्या गाड्यावर आणल्‍या होत्या. शीतपेये थंड करण्यासाठी असणाऱ्या थर्माकॉलच्या बॉक्समध्ये देखील हा बर्फ ठेवला होता. धक्कादायक बाब म्हणजे या बॉक्सला आणि बर्फाला चक्क मोठ्या मुंग्या लागल्या होत्या. हा सर्व प्रकार निदर्शनास येताच कोल्हापुरी हिसका दाखवत नागरिकांनी या हातगाडीवाल्याला चांगलाच चोप दिला. दरम्यान, हा बर्फ सीपीआर मधील शवागृहातील नसल्याचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे यांनी सांगितले

शुक्रवारी एका रुग्णवाहिकेने मृतदेह सोडून आल्यानंतर राहिलेला बर्फ सीपीआर समोरील गटारीवर टाकून दिला. हा बर्फ धूवून थंडपेय, पाणी आणि सरबतसाठी नेत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच त्याच्यावर लक्ष ठेवून नागरिकांनी त्याला शनिवारी पकडले. हा सर्व प्रकार निरंजन शिंदे, गजानन तोडकर, प्रशांत पाटील, योगेश केळकर, विकास जाधव यांच्यासह नागरिकांनी उघडकीस आणला. याबाबत मंगळवारी आपण महापालिकेच्या प्रशासन आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अन्न औषध प्रशासनचे अधिकारी यांना भेटून याबाबत माहिती देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते निरंजन शिंदे, गजानन तोडकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT