Women Weight Gain | महिलांच्या वाढत्या वजनाचा काटा, करी आयुष्याचा घाटा 
कोल्हापूर

Women Weight Gain | महिलांच्या वाढत्या वजनाचा काटा, करी आयुष्याचा घाटा

अतिरिक्त वजन वाढण्याचे प्रमाण ५ वर्षांत २४ वरून ३०.७ टक्क्यांवर

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा कदम

कोल्हापूर : एकेकाळी महिलांच्या आरोग्याची चर्चा झाली की कुपोषण, रक्तक्षय आणि कमी वजन हे प्रश्न समोर यायचे. मात्र आता याची दुसरी बाजूही तितकीच गंभीरपणे ठळक होत आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार १५ ते ४९ वयोगटातील महिलांचे वजन अतिरिक्त वाढले आहे. पाच वर्षापूर्वी २४ टक्के असलेले प्रमाण आजमितीस ३०.७ टक्क्यांपर्यंत गेले आहे. पाच वर्षातील ही वाढ साडेसहा टक्के असून प्रत्येक तीन महिलांपैकी एक महिला अतिरिक्त वजनाच्या कक्षेत आहे. महिलांच्या वाढत्या वजनाचा काटा धोक्याची घंटा देत असल्याचे चित्र त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची व्याप्ती दर्शवणारे आहे.

वजन का वाढतेय?

* बैठी जीवनशैली

* बदललेला आहार

* ताण आणि अपुरी झोप

* दुहेरी जबाबदाऱ्यांचा ताण

* वयानुसार हार्मोनल बदल

* गर्भधारणा, प्रसूतिकाळ, पूर्व रजोनिवृत्ती आणि रजोनिवृत्तीतील समस्या

* व्यायाम, आहार आणि नियमित आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष

ही आहे धोक्याची घंटा

* मानसिक चिडचिड

* न्यूनगंडाची भावना तीव्र

* मधुमेहाच्या प्रमाणात ५ टक्के वाढ

* स्थूलतेमुळे रक्तप्रवाहात अडथळे

* वाढत्या वजनामुळे हाडे ठिसूळ होण्याची चिन्हे

* मासिक पाळीतील अनियमितता

एक नजर आकडेवारीवर

15 ते 49 वयोगटातील अतिरिक्त

स्थूल महिला : ...........................30.7 टक्के

पाच वर्षातील वाढ : ....................06.7 टक्के

शहरी महिलांचे प्रमाण :................42.8 टक्के

ग्रामीण महिलांचे प्रमाण :..............25.2 टक्के

स्थूलतेमध्ये पोटाची चरबी वाढण्याचे प्रमाण ............................27 टक्के

वयोगटानुसार वाढत्या वजनाचा आलेख

15 ते 19 वर्षे :........14.6 टक्के

20 ते 29 वर्षे :........24.6 टक्के

30 ते 39 वर्षे :........34.8 टक्के

40 ते 49 वर्षे :........40.7 टक्के

सर्वेक्षणातील ही आकडेवारी गंभीर आहे. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, दैनंदिन शारीरिक हालचाल, पुरेशी झोप, तणावमुक्तीसाठी छंद जोपासणे व नियमित आरोग्य तपासणी याकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा वयाच्या पन्नाशीतच महिलांची आरोग्याची घडी बिघडून जाऊ शकते.
डॉ. मनीषा कस्तुरे, स्त्री रोग तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT