कोल्हापूर : भारतात स्तनाच्या कर्करोगानंतर आता महिलांमध्ये सर्वाधिक गर्भाशय मुखाचा कर्करोग आढळून येऊ लागला आहे. जिल्ह्यात या रुग्णांची संख्या वाढत असून देशात दररोज सुमारे 350 महिलांना या कर्करोगाचे निदान होते, तर 219 महिलांचा मृत्यू होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 9 ते 26 वयोगटातील मुलींचे लसीकरण महत्त्वाचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 5 हजार मुली व महिलांना एचपीव्ही ही प्रतिबंधक लस मोफत देण्यात आली आहे.
ओटीपोटात दुखणे
योनीमार्गात वेदना
संभोगावेळी त्रास होणे
योगीमार्गातून अनियंत्रित रक्तस्राव
किडनी विकाराची लक्षणे
वयाच्या 15 व्या वर्षानंतर धोका
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रामुख्याने वयाच्या 15 व्या वर्षांनंतर होण्याची शक्यता अधिक असते. 15 वर्षांवरील वयोगटातील महिलांचे देशातील प्रमाण हे 51 कोटींहून अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
गुप्तांगाची अस्वच्छता
असुरक्षित लैंगिक संबंध
कमी वयात लैंगिक संबंध
गर्भनिरोधकांचा बेसुमार वापर
ह्युमिनो पॉपिलोमा व्हायरसची लागण गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान वेळेत होणे महत्त्वाचे आहे. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महिलांनी आरोग्य तपासणीसाठी पुढे यावे.डॉ. रेश्मा पवार (कॅन्सर तज्ज्ञ)
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग दिवसेंदिवस वाढत आहे. 9 ते 26 वयोगटातील मुली व महिलांनी एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे. सामाजिक संघटना, दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने जिल्ह्यातील 5 हजार मुली व महिलांना मोफत लसीकरण केले आहे.राधिका जोशी (ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ)