Crime News : शिरढोणच्या नदीकाठावर केबल चोरांचा धुमाकूळ, शेतकऱ्यांमध्ये चिंता  file photo
कोल्हापूर

Crime News : शिरढोणच्या नदीकाठावर केबल चोरांचा धुमाकूळ, शेतकऱ्यांमध्ये चिंता

१० हून अधिक शेतकऱ्यांना फटका; कुरुंदवाड पोलिसांच्या गस्तीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Rise in cable thefts along the Shirdhon riverbank; farmers concerned

शिरढोण : पुढारी वृत्तसेवा : नदीकाठच्या शेतांमध्ये सिंचनासाठी टाकण्यात आलेल्या केबल वायर चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. आतापर्यंत १० हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतातील केबल वायर चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

शेतीच्या सिंचनासाठी नदीकाठावर टाकण्यात आलेल्या केबल वायर रात्रीच्या वेळी चोरट्यांकडून लक्ष्य केल्या जात आहेत. यापूर्वीही या परिसरात अशा घटना घडल्या असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. चोरी झाल्यानंतर नवीन केबल वायर खरेदी करून पुन्हा व्यवस्था करावी लागत असल्याने अतिरिक्त खर्चाचा भार शेतकऱ्यांवर पडत आहे.

नदीकाठच्या भागात रात्री वर्दळ कमी असल्याने चोरट्यांना संधी मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कुरुंदवाड पोलिसांनी घटनांची चौकशी करून चोरट्यांचा शोध घ्यावा, तसेच नदीकाठच्या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

'रात्रीची गस्त वाढविण्याची गरज'

नदीकाठच्या शेतांमध्ये रात्रीच्या वेळी शेतकरी नसल्याचा फायदा घेत केबल वायर चोरीच्या घटना घडत आहेत. वारंवार चोरी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. चोरी रोखण्यासाठी नदीकाठच्या भागात पोलिसांनी नियमित रात्रीची गस्त घालावी. संशयास्पद व्यक्ती व वाहनांची तपासणी करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT