कोल्हापूर : दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थी आणि पालकांचे डोळे पुढील प्रवेश प्रक्रियेकडे आणि करिअरच्या विविध पर्यायांकडे लागले आहेत. अशा महत्त्वपूर्ण टप्प्यावर विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी दैनिक ‘पुढारी’चे लोकप्रिय आणि बहुप्रतीक्षित ‘एज्युदिशा 2026’ शैक्षणिक प्रदर्शन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. यावर्षी हे प्रदर्शन कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले जात असून, नामवंत शैक्षणिक संस्थांसाठी स्टॉल बुकिंगची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.
एकाच छताखाली करिअरचे अगणित पर्याय, पारंपरिक कोर्सेसच्या पलीकडे जाऊन भविष्याचा वेध घेणारे अनेक पर्याय या प्रदर्शनात एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत. यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, डिफेन्स, फार्मसी, यासोबतच आजच्या काळातील अत्यंत गतिमान अशा एआय (अख), डेटा सायन्स, रोबोटिक्स, अॅग्रो टेक, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च आणि डिझाईन यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील करिअरच्या सुवर्णसंधींची माहिती थेट तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. यावर्षी विशेषतः ‘न्यू एज स्किल्स’ आणि ‘ग्लोबल स्टडी अपॉर्च्युनिटीज’ (परदेशातील शिक्षणाच्या संधी) या घटकांवर अधिक भर दिला जाणार आहे.
दिग्गज ब्रँडस्ची भागीदारी
या शैक्षणिक उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर’ हे आहेत; तर पावर्ड बाय प्रायोजक म्हणून ‘विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे’ हे लाभले आहेत. सहयोगी प्रायोजक म्हणून ‘एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी’ तर सहप्रायोजक म्हणून एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी पुणे, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, चाटे ग्रुप या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. पुणे, मुंबईसह देशभरातील नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात आपले स्टॉल लावणार आहेत.
स्टॉल बुकिंगसाठी त्वरित संपर्क करा
आपल्या संस्थेचे नाव हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 8149582442 किंवा 9545327545 या क्रमांकांवर संपर्क साधून आपला स्टॉल निश्चित करावा, असे आवाहन दैनिक ’पुढारी’तर्फे करण्यात आले आहे.
स्टॉल बुकिंगसाठी त्वरित संपर्क करा
आपल्या संस्थेचे नाव हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 8149582442 किंवा 9545327545 या क्रमांकांवर संपर्क साधून आपला स्टॉल निश्चित करावा, असे आवाहन दैनिक ’पुढारी’तर्फे करण्यात आले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
दै. ‘पुढारी’ आयोजित एज्युदिशामध्ये इयत्ता दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
पात्रता : 85 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी.
कोणी पाठवावे? : स्वतः विद्यार्थी, पालक किंवा संबंधित शाळा पाठवू शकतात.
काय करावे? : विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, शाळा/कॉलेजचे नाव आणि मार्कलिस्ट 8805007724 या क्रमांकावर व्हॉटस्अप करावी.
शिक्षण संस्थांसाठी सुवर्णसंधी आणि वैशिष्ट्ये : पुणे, मुंबई आणि देशभरातील अग्रगण्य शिक्षण संस्थांना हजारो गरजू विद्यार्थी आणि पालकांशी थेट संवाद साधण्यासाठी हे एक हक्काचे आणि प्रभावी व्यासपीठ आहे.
थेट संपर्क : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील हजारो पालकांशी वन टू वन संवाद.
व्यापक प्रसिद्धी : दैनिक ‘पुढारी’च्या मुख्य अंकासह ‘पुढारी न्यूज’ चॅनेल, एफएम रेडिओ, ऑनलाईन आणि डिजिटल सोशल मीडिया माध्यमातून राज्यभर व्यापक प्रसिद्धी.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन : करिअर समुपदेशन सत्रांचे आयोजन केल्यामुळे दर्जेदार आणि महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांचा मोठा ओढा.