कोल्हापूर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित आ. राजेश क्षीरसागर, आ. अमल महाडिक, आ. शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महेश जाधव, विजय जाधव, नाथाजी पाटील.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Ambabai Temple | महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सकाळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. राज्यातील सर्व नागरिकांना सुख, समृद्धी प्राप्त होवो व चांगला पाऊस पडून पर्यावरणाचे संवर्धन होवो, तसेच राज्यातील शेतकरी समृद्ध होवो यासाठी अंबाबाईचरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महसूलमंत्र्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. तसेच, मंदिर परिसराची पाहणी केली. देवस्थान समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते महसूलमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनीही करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची प्रतिमा, शाल देऊन बावनकुळे यांचा सत्कार केला. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, देवस्थान समिती सचिव वर्षा साळुंखे-परीट, महादेव दिंडे, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT