कोल्हापूर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दिवसभराच्या या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमांसह ते महसूल विभागाचा आढावाही घेणार आहेत.
बावनकुळे यांचे सकाळी ११ वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. दुपारी १२ वाजता ते आ. सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. दुपारी १ ते २.३० या वेळेत ते नष्टे लॉन येथे आयोजित महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेला ते उपस्थित राहणार असून दुपारी तीन ते पाच या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात ते नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत. सायंकाळी पाच वाजता ते महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी आणि भूमी अभिलेख विभागाची आढावा बैठक घेणार आहेत. रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी विमानतळावरून ते नवी मुंबईला रवाना होणार आहेत. दरम्यान मंत्री बावनकुळे यांच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.