Kolhapur Flood News
एनडीआरएफ पथकाकडून कोल्हापुरात बचाव कार्य Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Flood : एनडीआरएफ पथकाकडून कोल्हापुरात बचाव कार्य

पुढारी वृत्तसेवा

मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहरात पूरस्थिती गंभीर झाली आहे. पंचगंगा नदीत झपाट्याने वाढ होत असल्याने धोक्याच्या पातळीपेक्षाही पंचगंगा 46 फुटांवर वाहत आहे. यामुळे कोल्हापूर शहरात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी कुंभार गल्ली, व्हीनस कॉर्नर सह अनेक सखलभागात पाणी साचले आहे.

पूराचे पाणी शहरात शिरल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लगत असणाऱ्या चार ते पाच अपारमेंट मध्ये पंचगंगेच्या पुराचं पाणी शिरले. यामुळे तीन कुटुंबातील 12 जण घरांमध्ये अडकून पडली होती. एनडीआरएफच्या पथकाने जवळपास तासभर बचाव कार्य करत या सर्वांना भर पावसात बाहेर काढले. या भागात जवळपास चार ते पाच फूट पाणी साचले असून पाणी वाढतच चालले आहे.

SCROLL FOR NEXT