कोल्हापूर : देशांतर्गत साखर उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडीत ब्राझीलमधून कच्ची साखर आयात करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लिमिटेडने (टीआरक्यू) योजनेंतर्गत आयात करण्यात येणारी कच्ची साखर खरेदी करण्यासाठी देशातील साखर कारखान्यांकडून स्वारस्य प्रस्ताव (ईओआय) मागविले आहेत. भारतीय बंदरातील गोदामातून प्रतिमेट्रिक टन ४७ हजार रुपये या सूचक दराने ही साखर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.
इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने जारी केलेल्या पत्रानुसार, ब्राझीलमधून आयात होणारी कच्ची साखर डिसेंबर २०२६ मध्ये भारतीय बंदरातील गोदामातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. एका कारखान्याला किमान पाच हजार मेट्रिक टन साखर खरेदी करणे आवश्यक आहे.
दर ५४ रुपयांपर्यंत स्थिर ब्राझीलमधून ४७ रुपये प्रतिकिलो दराने कच्ची साखर आयात केली जाणार आहे. वाहतूक आणि साखरेवरील प्रक्रियेचा खर्च धरता ५४ रुपयांपर्यंत या साखरेचा दर राहू शकतो. त्यामुळे पुढील काळात देशांतर्गत साखरेचे दरही ५४ रुपयांपर्यंत स्थिर राहण्याची शक्यता आहे.विजय औताडे, साखर उद्योगतज्ज्ञ