kolhapur | उद्धवरावांची शिल्लक सेना... मोबाईल स्टेटसने चर्चेला उधाण  
कोल्हापूर

kolhapur | उद्धवरावांची शिल्लक सेना... मोबाईल स्टेटसने चर्चेला उधाण

वाघाच्या पिल्लाला बाटलीतून दूध; जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंच्या स्टेटसने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या मोबाईलवर वाघाच्या पिल्लाला बाटलीतून दूध पाजणारा फोटो आणि त्यावर ‘उद्धवरावांची शिल्लक सेना...’ असा मथळा लिहिलेला स्टेटस बुधवारी (दि. 1) झळकला. थेट पक्षप्रमुखांनाच आव्हान देणारा स्टेटस जिल्हाप्रमुखानेच लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवसैनिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

जिल्हाप्रमुख इंगवले यांच्या मोबाईलवर सकाळी 9.50 वाजता हा स्टेटस लावण्यात आला होता. काहींनी हा स्टेटस पाहून आश्चर्य व्यक्त करत त्याचे स्क्रीन शॉट काढून व्हायरल केले. काही मिनिटांत इंगवले यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तत्काळ स्टेटस डिलिट केले. त्यानंतर त्यांनी लहान मुलीकडून चुकून स्टेटस ठेवण्यात आले होते, कोणीही याचा राजकीय प्रपोगंडा करू नये, त्यापेक्षा सध्याचे वास्तव पाहावे, असा खुलासा करणारा दुसरा स्टेटस लावला; मात्र तोपर्यंत वाघाच्या पिल्लाचा स्टेटसचा स्क्रिन शॉट प्रचंड व्हायरल झाला होता. आधीच अंतर्गत लाथाळ्यांमुळे ठाकरे सेनेची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच चक्क जिल्हाप्रमुखानेच असा स्टेटस लावून ठाकरे सेनेला आरसा दाखविल्याची चर्चा सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT