समुद्राच्या लाटेच्या तडाख्याने बेशुध्द झालेल्या महिलेचा मृत्यू 
कोल्हापूर

Ganpatipule Beach Accident : समुद्राच्या लाटेच्या तडाख्याने बेशुध्द झालेल्या महिलेचा मृत्यू

गणपतीपुळे येथील घटना : चंदूरसह परिसरात शोककळा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गणपतीपुळे येथील मंदिरासमोर पाण्यात खेळण्याचा आंनद लुटत असताना भरतीमुळे अचानक आलेल्या उंच लाटेच्या तडाख्याने बेशुध्द झालेल्या चंदूर (ता. हातकणंगले) येथील संध्या स्वप्निल कांबळे ( वय 26) यांचा मंगळवारी सकाळी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

स्वप्निल कांबळे, पत्नी संध्यासह कुटुंबिय गणपतीपुळे रविवारी ( दि.24) रात्री गेले होते. सोमवारी सकाळी समुद्र किनाऱ्यावर पाण्यात खेळण्याचा आनंद घेत असताना अचानक समुद्राला भरती आली. पाण्याच्या उंच लाटेच्या तडाख्याने संध्या तोंडावर जोरात कोसळल्या. नाका- तोंडातून पाणी शरीरात गेल्याने बेशुध्द झाल्या. उपचार सुरू असताना त्यांचा पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबियांना धक्का बसला. संध्या यांचा पाच वर्षापुर्वी विवाह झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT