राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : राशिवडे खुर्द ते शिरगाव मार्गावरील ओढ्याच्या पुलाला मोटरसायकलची जोराची धडक बसली. ही घटना आज (दि.३१) पहाटेच्या दरम्यान घडली. या अपघातात अभिनव शरद गौड (वय १६) याचा मॄत्यू झाला. अपघाताची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. (Kolhapur Accident News)
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरगाव येथील अभिनव गौड हा मोटरसायकलवरुन (MHO9 FK OO18) राशिवडे खुर्दकडून शिरगावकडे येत होता. यावेळी मठाचे शेत नावाच्या शेताजवळ आल्यानंतर भरधाव असणाऱ्या अभिनवला रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकलची ओढ्याच्या पुलाला जोरात धडक बसली. यात त्याचा जागीच मॄत्यू झाला. अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत.