White squirrel | कोल्हापुरात दुर्मीळ पांढर्‍या खारुताईंचा शोध  
कोल्हापूर

White squirrel | कोल्हापुरात दुर्मीळ पांढर्‍या खारुताईंचा शोध

संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरातील मानवी वस्तीजवळ आढळलेल्या पांढर्‍या रंगाच्या दुर्मीळ दोन खारुताई दि. 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पक्षी निरीक्षण करताना मयुरेश रामपुरे आणि देवेंद्र भोसले यांना दिसल्या. आशा खारी पहिल्यांदाच आढळून आल्याने त्यांचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे.

खारुताईची पाहणी केल्यानंतर त्या ल्यूसीस्टिक (ङर्शीलळीींळल) प्रकारातील असल्याचे निष्पन्न झाले. ल्युसिझम हा आनुवंशिक विकार असून त्यामध्ये शरीरावरील रंगद्रव्य ( ाशश्ररपळप) अंशतः किंवा पूर्णपणे कमी होते; परंतु डोळ्यांचा रंग सामान्य राहतो. याचे महत्त्व लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी निरीक्षण सुरू केले आहे. त्यानुसार देवेंद्र भोसले, मयुरेश रामपुरे आणि सहायक प्राध्यापिका कल्पना साबळे यांनी या घटनेवर आधारित संशोधन निबंध तयार केला. हा निबंध आंतरराष्ट्रीय चरूवळलर या जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून त्याला वैज्ञानिक मान्यता मिळाली आहे. अभ्यासात छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशन, सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट तसेच कोल्हापूर अ‍ॅमॅच्युअर फोटोग्राफर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला.

रंगातील बदल असलेल्या प्राण्यांना नैसर्गिक वातावरणात जगणे आव्हानात्मक असते. कारण, त्यांची शिकार होण्याची शक्यता वाढते. कोल्हापुरातील या दुर्मीळ निरीक्षणामुळे स्थानिक परिसंस्थेतील जैविक विविधतेबाबत नव्याने प्रकाश पडला असून भविष्यात अशा घटनांच्या अधिक अभ्यासाची गरज अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT