Trapdoor spider new species | कोल्हापूरच्या मातीत दडलाय निसर्गाचा अदृश्य ‘इंजिनिअर’ 
कोल्हापूर

Trapdoor spider new species | कोल्हापूरच्या मातीत दडलाय निसर्गाचा अदृश्य ‘इंजिनिअर’

दारकरी कोळ्याची नवी प्रजाती उजेडात; ‘टायटॅनिडिओप्स कोल्हापुरेन्सिस’ केले नामकरण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या जैवविविधतेत आणखी एका महत्त्वपूर्ण शोधाची भर पडली आहे. निसर्गसंपन्न कोल्हापूर परिसरात संशोधकांनी ‘ट्रॅपडोअर’ प्रकारच्या कोळ्याची एक दुर्मीळ आणि नवी प्रजाती शोधून काढली. स्थानिक भाषेत ‘दारकरी कोळी’ म्हणून ओळखणार्‍या या कोळ्याचे ‘टायटॅनिडिओप्स कोल्हापुरेन्सिस’ असे नामकरण केले आहे.

शिवाजी विद्यापीठातील संशोधक आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा शोध लागला. त्याचा सर्व तपशील आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री’मध्ये प्रसिद्ध झाला. यामुळे याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली.

‘ट्रॅपडोअर’ तंत्रज्ञान हे या कोळ्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. हे जमिनीत सुमारे 100 सेंटिमीटर किंवा त्याहून अधिक खोल बीळ तयार करतात. त्याला माती, लाळ आणि कोळ्याच्या जाळ्यापासून बनवलेले घट्ट झाकण म्हणजेच ‘दार’ असते. हे दार जमिनीशी मिळतेजुळते असते. ते मानवी डोळ्यांना सहज दिसत नाही. यामुळेच त्याला ‘दारकरी’ असे म्हटले जाते. द़ृष्टी मर्यादित असली तरी अंगावरील केस आणि संवेदना अत्यंत तीव— असतात. जमिनीवरील सूक्ष्म कंपने ओळखून तो अंधारातही अचूक शिकार करतो. भक्ष्य दाराजवळ येताच, क्षणात बाहेर येऊन त्याला पकडतो व पुन्हा बिळात जाऊन दार लावून घेतो.

अस्तित्वाला धोका

मादी कोळी 43 वर्षांपर्यंत जगू शकते. या कोळ्यांच्या अस्तित्वाला वाढते शहरीकरण, रस्ते, बांधकामे आणि परदेशी वृक्षांच्या लागवडीने धोका निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT