Ambabai temple Rathotsav | अंबाबाई मंदिर आवारातील रामाचा रथोत्सव उत्साहात  
कोल्हापूर

Ambabai temple Rathotsav | अंबाबाई मंदिर आवारातील रामाचा रथोत्सव उत्साहात

नगर प्रदक्षिणा मार्गावर रांगोळ्यांसह पुष्पवृष्टी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर आवारातील रामाचा पार येथील छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या राम मंदिरातील रामाचा रथोत्सव गुरुवारी श्री रामनवमीनिमित्त उत्साहात पार पडला. रात्री साडेनऊ वाजता संभाजीराजे व मालोजीराजे यांच्या हस्ते रथपूजन झाल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात रथ मिरवणुकीसाठी बाहेर पडला. नगर प्रदक्षिणा मार्गावरून भाविकांच्या साक्षीने रथाची मिरवणूक काढण्यात आली.

दरवर्षी रामनवमीनिमित्त अंबाबाई मंदिरातील रामाचा रथोत्सव साजरा केला जातो. पारंपरिक नगर प्रदक्षिणा काढली जाते. गुरुवारी रात्री रथोत्सवासाठी रामाचा रथ फुलांनी सजवण्यात आला होता. संभाजीराजे व मालोजीराजे यांनी मानाचा रथ ओढून रथोत्सवाला प्रारंभ केला. गाडगे महाराज पुतळा चौक, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप कमान, खासबाग, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे महाद्वार रोडवरून रथ पुन्हा मंदिरात आला. नगर प्रदक्षिणा मार्गावर रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती.

फुलांच्या पायघड्या तसेच पुष्पवृष्टी करण्यात आली. आतषबाजीने परिसर उजळून गेला. रामनामाच्या अखंड जयघोषात रथोत्सवाची सांगता झाली. यावेळी राजेंद्र चव्हाण, राजू मेवेकरी यांनी नियोजन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT