जयसिंगपूर : येथे २५ व्‍या ऊस परिषदेसाठी हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. दुसऱ्या छायाचित्रात ऊस परिषदेत बोलताना राजू शेट्टी.  
कोल्हापूर

Raju Shetty : टनाला ५,५०० रुपये दिल्याशिवाय उसाच्‍या कांडीला हात लावू देणार नाही

: जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद

पुढारी वृत्तसेवा

संतोष बामणे

जयसिंगपूर : उसाला साखर कारखान्यांकडून ५,००० रुपये व केंद्राकडून ५०० रुपये अनुदान, असे एकूण ५,५०० रुपये प्रतिटन दिल्याशिवाय उसाच्या कांडीला हात लावू देणार नाही. ऊस तुटल्यानंतर पहिल्या १५ दिवसांत ४,५०० रुपये व कारखाना बंद होताना ५०० रुपये घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. १२ ऑक्टोबरला केंद्राकडील मागण्या मान्य न झाल्यास १३ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता कोगनोळी टोल नाक्यावर निर्णय होईपर्यंत राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला.

जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २५ वी ऊस परिषद शनिवारी संपन्‍न झाली. अध्यक्षस्थानी शिवाजी मोरे होते. यावेळी राजू शेट्टी बोलत होते. शेट्टी पुढे म्हणाले, यावर्षी केंद्र सरकारची मानगूट शेतकऱ्यांच्या हातात सापडली आहे. दसरा व दिवाळीला देशात साखरेचा तुटवडा पडणार आहे. साखरेची एमएसपी ५० रुपये आणि इथेनॉलचा दर ७० रुपये झाल्याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांतील कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही व शिल्लक साखर गोडावूनच्या बाहेर पडू देणार नाही. त्यामुळे आमच्या मागण्या केंद्र सरकारला मान्य कराव्याच लागणार आहेत.

प्रथम राजू शेट्टी, व्ही. एम. सिंह, चुन्‍नाप्पा पुजारी, शशिकांत गुरुजी, प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, घनश्याम चौधरी, प्रकाश बालवडकर या मान्यवरांच्‍या हस्ते दीपप्रज्वलन झाले. स्वागत सचिन शिंदे, तर प्रास्ताविक पै. विठ्ठल मोरे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार, प्रदेशाध्यक्ष मयूर बोर्डे यांच्यासह शेतकरी नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हजारो शेतकरी उपस्थित होते.

घरावर ‘डीएनए’ तपासा म्हणून लिहा

केंद्र सरकारला भीक घालू नका. ऊस आणि कारखाना आमचा आहे. सरकारचे तळवे चाटायचे नाहीत आणि जो कुणी गद्दार कारखानदार सरकारचे ऐकून कारखाने सुरू करेल त्याच्या घरावर जाऊन त्याचा ‘डीएनए’ तपासावा असे शेतकऱ्यांनी लिहावे, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT