Marathi Film Corporation | चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी राजेभोसले यांचे नाव आघाडीवर 
कोल्हापूर

Marathi Film Corporation | चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी राजेभोसले यांचे नाव आघाडीवर

अन्य मुख्य पदांमध्ये शेलार, यमकर चर्चेत; सोमवारी कार्यकारिणीची बैठक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकारी निवडीसाठी नूतन कार्यकारिणीची पहिली बैठक सोमवारी (दि. १५) कोल्हापुरात होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, खजानिस यासह प्रमुख पदांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी समर्थ पॅनेलप्रमुख मेघराज राजेभोसले यांचे नाव आघाडीवर आहे. तर उपाध्यक्ष, कार्यवाह यासह अन्य प्रमुख पदांमध्ये सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुनील महाजन, राज काझी यांच्या नावांची चर्चा आहे.

महामंडळाच्या २०२६ - २०३१ साठी झालेल्या निवडणुकीत १७ जागांपैकी समर्थ पॅनेलचे १६ उमेदवार विजयी झाले. तर विरोधी चित्रकर्मी पॅनेलच्या वर्षा उसगावकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीची सूचना महामंडळ प्रशासनाच्या वतीने नूतन संचालकांना पाठवली आहे.

स्वीकृत संचालकांमध्ये कोण येणार?

सध्या महामंडळात १७ संचालकांची कार्यकारिणी आहे. मात्र, महामंडळाच्या प्रस्तावित कामाचा आराखडा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी तसेच विकासकामांची व्याप्ती वाढवण्यासाठी स्वीकृत संचालकांची संख्या दोनवरून चार करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे स्वीकृत संचालकांच्या यादीत कोणाचे नाव असणार याचीही उत्सुकता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT