Rajendranagar Gambling Raid | राजेंद्रनगर येथील जुगार अड्ड्यावर छापा : ५ अटकेत 
कोल्हापूर

Rajendranagar Gambling Raid | राजेंद्रनगर येथील जुगार अड्ड्यावर छापा : ५ अटकेत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील शिव मित्र तरुण मंडळालगत रवी सोनटक्के याच्या घराच्या पिछाडीला सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून म्होरक्यासह ५ जणांना अटक केली. १६ हजार ६०० रुपयांच्या रकमेसह ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

म्होरक्या नीलेश ऊर्फ आकाश राजू पाटील (वय ३३, साळोखे पार्क, भारतनगर, सध्या रा. गंगावेश तालमीजवळ, कोल्हापूर), इरफान सिकंदर शेख (३२, बुद्ध विहार शेजारी, भारतनगर), धीरज अविनाश सकट (महादेव कॉलनी, राजेंद्रनगर), रवी राजू सोनटक्के (राजेंद्रनगर), रसूल हबिब शेख (साळोखे पार्क, भारतनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांकडून १६ हजार ६०० रुपये, दुचाकी, मोबाईल असा ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT