कुरुंदवाड : राजापुरात शनिवारी लागलेल्या आगीत 12 एकर ऊस जळून खाक झाला. दुपारी एकच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना अचानक आग लागली. काही मिनिटांतच वार्याच्या वेगामुळे आगीने विक्राळ रूप धारण केले आणि शेजारील शेतांपर्यंत आग पसरली.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, विद्युत तारेचे शॉर्टसर्किट झाले असावे किंवा अज्ञात व्यक्तीने आग लावली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या आगीत शहाजहान जमादार, महादेव चौगुले, आनगोंडा पाटील, गुराप्पा कुंभार, नीगोंडा पाटील, शकुंतला कलगोंडा पाटील तसेच घुणके या शेतकर्याचे नुकसान झाले. आगीमध्ये जळालेला ऊस हा आडसाली हंगामातील असून तोडणीस आला होता.
स्थानिक प्रशासन आणि विद्युत विभागाने घटनास्थळी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.