दोनवडे (कोल्हापूर) : सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदीला पूर आला आहे. सध्या पूरस्थिती जैसे थे आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर महापुराची शक्यता आहे. मागील वर्षी पावसाळ्यात पूर आल्याने बालिंगे-दोनवडे दरम्यानच्या भोगावती पुलावरून वाहतूक बंद केली होती. आता तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज (गुरुवारी) सायंकाळी कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील बालिंगे-दोनवडे दरम्यान सुरू असलेली वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरक्षेच्या कारणावरून बालिंगे ते दोनवडे दरम्यानची वाहतूक बंद केली आहे. गुरुवारी दुपारीपर्यंत कोणतीही सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेली नव्हती. सायंकाळनंतरच्या परिस्थितीनुसार राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता आर. बी. शिंदे यांनी रस्ता बंद केला.किरण पाटील, तलाठी, बालिंगे