कोल्हापूर : कोल्हापुरात कमाल तापमानात घट झाली असली तरी उन्हाचा तडाखा कायम आहे. रविवारी दैनंदिन सरासरी कमाल तापमानात किंचित घट होऊन पारा 36.4 अंशांवर स्थिरावला होता; तर किमान तापमान 23 अंशांवर होते. बुधवार (दि. 6) पासून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी (दि. 8) दुपारनंतर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे कोल्हापुरातील वातावरणात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.
रविवारचे राज्याचे तापमान
वर्धा 44.5, चंद्रपूर 44.4, अमरावती 44, अकोला 43.9, पुणे 37, अहिल्यानगर 40.2, जळगाव 41.8, कोल्हापूर 36.4, महाबळेश्वर 31.2, मालेगाव 42,नाशिक 37.2, सांगली 39.1, सातारा 39.2, सोलापूर 42.8, धाराशिव 40.2, छत्रपती संभाजीनगर 41.5, परभणी 42.2, नांदेड 42.4, बुलडाणा 41.0, ब्रह्मपुरी 43.8, गोंदिया 41.2, नागपूर 43.8, वाशिम 41.8, यवतमाळ 42.6.