कोल्हापूर : महाद्वार रोड, शुक्रवार गेट पोलिस चौकीजवळील तीनपानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणने छापा टाकून 58 जणांना ताब्यात घेतले. कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. Pudhari File Photo
कोल्हापूर

Gambling Den Raid | महाद्वार रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

58 जण ताब्यात; पोलिस अधीक्षकांचा आदेश धाब्यावर : पोलिस चौकीजवळच जुगारी अड्डा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महाद्वार रोडवर जिरगे बोळात, शुक्रवार गेट पोलिस चौकीजवळ करवीर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने नुकताच छापा टाकून 58 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. जुगार अड्ड्यावरील छाप्यात लाखाची रोकड, मोबाईल, दुचाकी, असा सुमारे 5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.

विलास हंबीरराव सरनाईक (66, रा. शिवाजी पेठ) यांच्या मालकीचा क्लब अय्याज फकीर (रा. जवाहरनगर) हा चालवत असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे. क्लबवरील कामगारासह 58 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने ताब्यात घेऊन संशयितांना जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे स्वाधीन केले. ताब्यात घेतलेल्यात प्रकाश गोपाळ जाधव (वय 58), भारत नामदेव मोरे (48), दत्तात्रय रामचंद्र कोईंगडे (44, रा. भैरवनाथ गल्ली, मोरेवाडी, ता. करवीर), नितीन बाबूराव गवळी (40, चंबुखडी), अमृत बाबासाहेब पाटील (फिरंगाई तालीमजवळ, शिवाजी पेठ), गजानन गोविंद केळसकर (28, राम गल्ली, मंगळवार पेठ), वसंत धर्मा शिंदे (56, डवरी वसाहत, यादवनगर), महेश शिवाजी माने (चौदावी गल्ली, राजारामपुरी), रियाज रफिक शेख (42, सरनाईक वसाहत, जवाहरनगर), उत्तम महादेव शेणवे (42, मोरेवाडी), उदय शांतीलाल शहा (70, सोमवार पेठ), प्रकाश दत्तात्रय पाटील (54, पाडळी खुर्द, करवीर), भगवान गोविंद धुरी (56, भोगावती, राधानगरी), कुणाल सुरेश आब्रे (28, राजेंद्रनगर), जोतिराम शामराव जाधव (51, शिंगणापूर, करवीर), दिगंबर मारुती नरके (39, हणमंतवाडी, करवीर), अजिंक्य काकाजी जौंजाळे (39, मिसाळ गल्ली, राजेंद्रनगर), आनंदा दादू रावण (65, रायगड कॉलनी, पाचगाव, करवीर), रोहित सुरेश आवळे (32, सुभाषनगर), सुनील आबासाहेब कांबळे (52, दौलतनगर), अमित धोंडिराम भोसले (45, सायबर चौक), रफिक हुसेन सनदी (55, देवकर पाणंद), शंकर बाबुराव जाधव (49, जुना वाशी नाका), युवराज दिगंबर राबाडे (48, धोत्री गल्ली, गंगावेश) संकेत हेमंत नाखरे (38, पन्हाळा), राजेंद्र काशीनाथ आडसुळे (58, शनिवार पेठ), शरद आत्माराम वडर (46, माणगाव, हातकणंगले), धनाजी कृष्णांत चुयेकर (49, वाशी, करवीर), परशुराम पांडुरंग गाडीवडर (सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ), संभाजी गणपतराव गोंदकर (62, सोमवार पेठ), गंगाराम जयराम गोसावी (46, वडणगे), राजेंद्र तुकाराम गुंडप (60, बुधवार पेठ), सतीश अशोक संकपाळ (35, माळवाडी, शिंगणापूर), संतोष श्रीमंत सिद्ध (40, लक्षतीर्थ वसाहत ), राजू आप्पालाल मुजावर (63, जोशी गल्ली, शुक्रवार पेठ), आनंद हणमंत काळे (50, शुक्रवार पेठ), दीपक गणपती पाटील (42, मोरेवाडी, करवीर), विजय गोविंद आडसुळे (47, लक्षतीर्थ वसाहत), शिवाजी दत्तात्रय शिवलंगन (58, धामोड, राधानगरी), सर्जेराव सीताराम पाटील (53, खुपिरे, करवीर), राजा भागोजी शेळके (30, फुलेवाडी), तौफिक मुबारक आत्तार (45, शुक्रवार पेठ), संदीप मधुकर रामाणे (42, सातार्डे, पन्हाळा), अमर तायाप्पा कांबळे (50, शिंगणापूर), सर्जेराव सदाशिव कुरणे (50, कळे, पन्हाळा) यांचा समावेश आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.

कारवाईमुळे शहरात उलट-सुलट चर्चा

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील मटका, तीनपानी जुगारी अड्ड्यांसह काळे धंदे बंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक धीरजकुमार गुप्ता यांनी प्रभारी अधिकार्‍यांना दिले आहेत. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतरही सतत गजबजलेल्या महाद्वार रोडवर जिरगे बोळामध्ये तीन मजली इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईमुळे शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. पोलिस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा प्रकार म्हणायचा की काय, अशीच शहरात चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT